सरकारनामा ब्यूरो
दोन पॅनकार्ड ठेवणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होणार आहे. कोणते आहेत नवीन नियम जाणून घ्या.
भारतामध्ये दोन पॅन कार्ड वापरणं आता गुन्हा असणार आहे आणि यासाठी कडक कारवाई देखील केली जाणार आहे.
जर कोणत्याही व्यक्तीकडे दोन पॅनकार्ड असेल तर, त्यातील एक पॅनकार्ड त्याला त्वरित जमा करावे लागेल.
पॅनकार्ड जमा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.
पॅनकार्डधारक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पॅनकार्ड जमा करू शकणार आहे.
दोन पॅनकार्ड वापरणाऱ्या व्यक्तीची चौकशी आयकर विभागाकडून होऊन, त्या व्यक्तीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार.
तब्बल 10,000 रुपयांचा दंड देखील आकारला जाणार आहे.
खोटे पॅनकार्ड तयार करणारे, कायद्याची फसवणूक करणाऱ्यांवर आळा बसवण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत.