सरकारनामा ब्यूरो
राजस्थान येथील दोन IAS अधिकाऱ्यांना प्रत्येकी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जाणून घेऊयात कोण आहेत हे दोन आयएएस अधिकारी आणि का मिळाली त्यांना शिक्षा?
या दोन IAS अधिकाऱ्यांपैकी एकाचे नाव प्रवीण गुप्ता आणि दुसरे अधिकारी भास्कर ए सावंत आहे.
या दोन्ही अधिकाऱ्यांना जयपूरच्या न्यायालयाने तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे दोन्ही अधिकारी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे.
पाइपलाइन टाकण्याच्या प्रकल्पात सुमारे 31 कोटी रुपये न भरल्याबद्दल भास्कर ए सावंत यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा तर, रस्ते बांधकाम कंत्राटदारांचे थकबाकी न भरल्याच्या कारणाने प्रवीण गुप्ता यांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सांगलीचे रहिवासी असलेले भास्कर ए. सावंत यांचे पूर्ण नाव भास्कर आत्माराम सावंत आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी प्राप्त केली आहे.
1996 मध्ये त्यांना राजस्थान केडर मिळाले होते. त्यांनी अनेक वेगवेगळी पदे भूषवलेली आहेत. सध्या ते राजस्थानच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी आणि भूजल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
मूळचे लखनऊचे रहिवासी असलेले प्रवीण गुप्ता यांनी प्रथम बी.टेक.चे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात एमए, एम.एस्सी, आणि भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली .
1995ला त्यांची IAS पदी नियुक्ती करण्यात आली. 1997 ला त्यांची पहिल्यांदा माउंट आबूचे एसडीओ म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते जयपूर येथील राजस्थान येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.