Deepika Adhana Story: जीवाची बाजी लावत 23 वर्षांच्या लेडी पायलटनं 169 प्रवाशांना सुखरुप परत आणलं

Deepak Kulkarni

युद्धाचा भडका

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे.

Woman Pilot Deepika Adhana Iran Israel War | Sarkarnama

संघर्ष टोकाला

युध्दाचा बुधवारी 12 वा दिवस होता. या युध्दाच्या काळात इराण विरुद्ध अमेरिका-इस्त्रायल संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

America Iran Israel War | Sarkarnama

युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

या संकटकाळात अनेक देशांचे नागरिक हे युद्धभूमीत अडकून पडले आहेत. त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

Faridabad Woman Pilot Deepika Adhana ... | Sarkarnama

लेडी पायलट

इराण आणि इस्रायलमधील भडकलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच काळात एअर इंडिया एक्सप्रेसच्या या लेडी पायलटनं जीवाची बाजी लावत मोठी मोहीम फत्ते केली आहे.

Faridabad Woman Pilot Deepika Adhana ... | Sarkarnama

फरिदाबादची लेक

जबरदस्त धैर्य दाखवलेली ही लेडी पायलट म्हणजे फरिदाबादची लेक दीपिका अधाना आहे.

Faridabad Woman Pilot Deepika Adhana ... | Sarkarnama

169 भारतीय प्रवाशी मायदेशी

दीपिकानं युएईमध्ये अडकलेल्या 169 भारतीय प्रवाशांना सुखरूप मायदेशी परत आणण्याची कौतुकास्पद कामगिरी यशस्वीरित्या पार पडली.

Faridabad Woman Pilot Deepika Adhana ... | Sarkarnama

महिला क्रू मेंबर्स

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व मोहीम महिला क्रू मेंबर्सनी यशस्वी केली. घरातून बाहेर पडताना दीपिकाने आपल्या आईला, मी परत येईन की नाही माहीत नाही, पण मला जावं लागेल असं शब्द उच्चारले अन् सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

Faridabad Woman Pilot Deepika Adhana ... | Sarkarnama

अचानक ड्युटी

दीपिका अधानाला 6 मार्च रोजी सकाळी तिला रॅस अल खैमाह येथे बचाव मोहिमेसाठी जायचे असल्याचा निरोप मिळाला. अचानक ड्युटी बदलली आणि अवघ्या 2 तासांत ती या कठीण मोहिमेसाठी तयार झाली.

Faridabad Woman Pilot Deepika Adhana ... | Sarkarnama

NEXT: देशात पहिल्यांदाच इच्छामरणाला परवानगी; सर्वोच्च न्यायालयाने 'ज्याच्या'साठी ऐतिहासिक निर्णय दिला 'तो' कोण?

Harish Rana | Sarkarnama
येथे क्लिक करा...