शेतकऱ्यांचा मोठा फायदा! शेतात तार कुंपण लावण्यासाठी सरकार देतंय 90% अनुदान, लगेच करा अर्ज, हे कागदपत्रं ठेवा तयार!

Rashmi Mane

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपण फायदेशीर ठरते. मात्र त्याचा खर्च मोठा असल्याने शासनाकडून अनुदान दिले जाते.

किती अनुदान मिळते?

एक ते दोन हेक्टरसाठी 90%, दोन ते तीन हेक्टरसाठी 60%, तीन ते पाच हेक्टरसाठी 50%, तर पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 40% अनुदान मिळते.

योजनेचा मुख्य उद्देश

वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान कमी करणे, उत्पादनाचे संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांना कुंपण उभारण्यासाठी आर्थिक मदत देणे हा योजनेचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा?

काटेरी तार आणि लोखंडी खांबांच्या कुंपणामुळे पिकांचे संरक्षण होते. त्यामुळे नुकसान कमी होऊन उत्पादन टिकवण्यास मदत मिळते आणि वारंवार कुंपणाचा खर्चही कमी होतो.

कोणाला मिळणार लाभ?

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शेतीचा कायदेशीर मालक किंवा भाडेतत्त्वावरील शेतकरी असणे आवश्यक आहे. जमीन अतिक्रमणमुक्त असणे गरजेचे आहे.

आणखी कोणत्या अटी?

शेती वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत नसावी. पिकांच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक असून ग्राम विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती लागते.

कागदपत्रे तयार ठेवा

जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव, वन अधिकाऱ्याचा दाखला आणि स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर मालकांचे संमतीपत्रही द्यावे.

अर्ज कुठे करायचा?

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित पंचायत समितीशी संपर्क साधावा. अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती निश्चितपणे तपासा.

Next : तुम्हाच्याकडे PNG गॅस कनेक्शन आहे? 1 सप्टेंबरपासून पाईप गॅसचा नवा नियम लागू! जाणून घ्या 5 महत्त्वाचे बदल

येथे क्लिक करा