Farm Loan Waiver : कर्जमुक्तीबाबत 'ते' आठ महत्त्वाचे प्रश्न अन् त्याची उत्तरे, शेतकऱ्यांना माहिती असायला हवेत!

Roshan More

किती कर्जमाफी?

तुमच्या पीक कर्जाची मुद्दल आणि व्याज मिळून जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतची थकबाकी या योजनेत थेट माफ केली जाईल.

Farm Loan Waiver 2026 | Sarkarnama

कालावधी

उत्तर: तुम्ही १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या काळात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज जर ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असेल आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत तुम्ही ते भरले नसेल, तर त्या कर्जाला ही माफी मिळेल.

Farm Loan Waiver 2026 | Sarkarnama

२ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज...

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तरी देखील लाभ मिळेल. त्याला ‘एकवेळ समझोता’ योजना म्हटले आहे. जर तुमचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला २ लाखांच्या वरची अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत भरावी लागेल.

Farm Loan Waiver 2026 | Sarkarnama

कर्ज ५० हजार रुपयांपेक्षा कमी

तुमचे कर्ज ५० हजारांपेक्षा कमी असल्यास, तुम्ही जेवढी मुद्दल व व्याजाची रक्कम बँकेत भरली आहे तेवढीच रक्कम किंवा किमान ५,००० रुपये तुम्हाला प्रोत्साहन म्हणून मिळतील.

Farm Loan Waiver 2026 | Sarkarnama

जमीनीची अट आहे का?

कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी किती एकर जमीन असावी अशी काही अट आहे नाही.या योजनेत जमीन धारणेचे क्षेत्र कितीही असले तरी (कोणतीही अट न ठेवता) शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

Maharashtra farm loan waiver | Sarkarnama

कर्जमाफी अर्ज

तुम्हाला कुठेही लेखी अर्ज करायची गरज नाही. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. बँका स्वतः तुमची माहिती शासनाच्या पोर्टलवर देतील.

Maharashtra farm loan waiver

कागदपत्रांची अट?

आधार प्रमाणीकरण करणे आणि ‘ॲग्रीस्टॅक’ या सरकारी प्रणालीवर तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे.

Maharashtra farm loan waiver

नोंदणी नसेल तर...

ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नसल्यामुळे कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. प्रथम तुमची नोंदणी करून घेतली जाईल आणि मगच लाभ दिला जाईल, यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

Farm Loan Waiver

कोणत्या बँकांचे कर्ज माफ

राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि गावाकडच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (सोसायट्या) यांच्याकडून घेतलेले कर्ज माफ होईल.

Shetkari Karjmafi Big Change in Loan Waiver Scheme | AI Image

NEXT: फडणवीस सरकारचं मोठं यश; विरोधकांच्या पाठिंब्यासह 'लाडक्या बहिणीं'साठी घेतला अभिमानास्पद निर्णय,लाखो महिलांना मिळणार लाभ

maharashtra governmen women farmers empowerment bill 2026 | Sarkarnama
येथे क्लिक करा