Ganesh Sonawane
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असतील हे जाणून घेऊया...
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे.
मात्र यात ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार आहे.
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ (अनुदान) दिले जाणार आहे.
थोडक्यात, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जाची थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.