Ganesh Sonawane
क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सानिया चांडोक सोबत विवाह बंधनात अडकला.
हा भव्य विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथे पार पडला. या लग्नसोहळ्यात खास दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या लग्न सोहळ्याला हजेरी लावली.
बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिडा विश्वातील दिग्गज, उद्योगपती आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघे मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अर्जुन आणि सानिया यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
सचिन तेंडुलकर यांनी अनेक दिग्गज लोकांना या लग्नासाठी निमंत्रण दिलं होतं.