Roshan More
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.
प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी केंद्र चालकाकडे आपला आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील विशिष्ट क्रमांक (Special ID) सादर करणे आवश्यक आहे.
केंद्र चालक पोर्टलवर शेतकऱ्याची 'अँग्रीस्टॅक' (Agristack) नोंदणी तपासेल आणि नोंदणी नसल्यास ती तातडीने पूर्ण करून देईल.
संगणकावर दिसणारा आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि थकीत रक्कम योग्य असल्याची शेतकऱ्याने खात्री करून सहमती देणे गरजेचे आहे.
माहिती योग्य असल्यास शेतकऱ्याने बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) द्वारे 'Submit' करून केंद्र चालकाकडून पावती प्राप्त करून घ्यावी.
आधार क्रमांक चुकला असल्यास मूळ आधारकार्ड दाखवून तक्रार नोंदवावी आणि प्रणालीद्वारे मिळणारी तक्रार पावती सोबत ठेवावी.
कर्जाच्या रकमेत किंवा खात्यात काही फरक असल्यास बायोमेट्रिक करून असहमतीची नोंद करावी, ही तक्रार जिल्हा समितीकडे पाठवली जाईल.
बोटांचे ठसे न जुळल्यास केंद्र चालक स्वतःच्या बायोमेट्रिकने तक्रार दाखल करेल आणि त्याची पावती तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी शेतकऱ्याला देईल.