सरकारनामा ब्यूरो
कॉन्स्टेबल ते डेप्युटी कलेक्टर असा प्रेरणादायी प्रवास असलेले दीपक सिंग यांची सक्सेस स्टोरी...
यूपी पोलिस दलात कॉन्स्टेबल असलेले दीपक सिंग यांनी 2023ची UPCS परीक्षा उत्तीर्ण करीत 20वा क्रमांक पटकावला आहे.
दीपक सिंग यांची पहिली पोस्टिंग लखनऊ जिल्ह्यातील हरदोईमध्ये झाली आहे. एसडीएम या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपक सिंग हे मूळचे उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांना 2018मध्ये मध्ये यूपी पोलीस दलात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली होती.
कॉन्स्टेबलची नोकरी मिळाल्यानंतरही दीपक सिंग यांनी त्यांचा अभ्यास सोडला नाही. त्यांंनी युपीसीएस परीक्षेची तयारी सुरुच ठेवली.
दीपक यांना अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला. शेवटी पाचव्या प्रयत्नात ते यशस्वी झाले.
पोलील दलात काम करीत असताना, एसपींसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.