Nilesh Lanke : कांदा आणि दूध दरवाढीसाठी ट्रॅक्टर मोर्चा

Pradeep Pendhare

ट्रॅक्टरच ट्रॅक्टर...

खासदार नीलेश लंके यांनी कांदा आणि दुधाला भाववाढी पुकारलेल्या जनआक्रोश आंदोलनाचा तिसरा दिवस शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चानं गाजला.

Nilesh Lanke | Sarkarnama

नेत्यांचा सहभाग

नगर शहरातील मार्केटपासून मोर्चाला सुरवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी झाले होते.

Nilesh Lanke | Sarkarnama

पोलिस बंदोबस्त

ट्रॅक्टर मोर्चामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शहरातील प्रत्येक चौकात फिक्स पाॅईंट पोलिसांनी लावले होते.

Nilesh Lanke | Sarkarnama

राणी लंकेंचा सहभाग

खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

Nilesh Lanke | Sarkarnama

रस्ता जाम झाला

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारा रस्ता ट्रॅक्टरांमुळे जाम झाला होता. ट्रॅक्टरची संख्या जास्त असल्याने औरंगाबाद महामार्गावर ट्रॅक्टर उभे होते.

Nilesh Lanke | Sarkarnama

दिंडी आणि शेतकरी

आंदोलनात शेकडो वृद्ध शेतकरी सहभागी झाले होते. दिंडी समोर जात असताना मोर्चातील शेतकऱ्यांनी वारकऱ्यांचे अभिवादन केले.

Nilesh Lanke | Sarkarnama

खासदार लंकेंचा मुक्काम

आंदोलन सुरू झाल्यापासून खासदार नीलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तळ ठोकून आहेत. तिथे उभारलेल्या मंडपात ते कार्यकर्त्यांसमवेत झोपत आहेत.

Nilesh Lanke | Sarkarnama

ट्रॅक्टरसह पाळीव जनावरं

आंदोलनाच तिसरा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी त्यांची पाळीव जनावरं बांधली होती. तसेच शेतातील औजारे देखील ट्रॅक्टरसह उभी होती.

Nilesh Lanke | Sarkarnama

NEXT : 'शेतकरी पुत्र' म्हणवणारे सदाभाऊ खोत कोट्यधीश; एकूण संपत्ती किती?

येथे क्लिक करा :