शेतकऱ्याची लेक झाली IPS', बापाचा उर भरुन आला ; कुणाकडून घेतली प्रेरणा?

Ganesh Sonawane

पाटणे गाव

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पाटणे गावातील धनश्री अहिरे हिने UPSC परीक्षा उत्तीर्ण करत IPS पदाला गवसणी घातली. देशातून ४८९ रँक मिळवली.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

पाचव्या प्रयत्नात यश

धनश्रीने पाचव्यांदा UPSC परीक्षा दिली आणि अखेर यश मिळवले. तिच्या चिकाटीमुळे मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या आधीच्या प्रयत्नांनंतरही तिने हार मानली नाही.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण

धनश्रीचे प्राथमिक शिक्षण पाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.
माध्यमिक शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात पूर्ण करत तिने शिक्षणात सातत्य राखले.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

बारावीत तालुक्यात प्रथम

अकरावी-बारावीचे शिक्षण सटाणा येथील महाविद्यालयात घेतले.
बारावीमध्ये तिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी

पुढील शिक्षणासाठी तिने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पुण्यात दोन वर्षे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

IPS होण्याचं स्वप्न बारावीतच

बारावीपासूनच धनश्रीने IPS अधिकारी होण्याचे स्वप्न मनात ठेवलं.
यानंतर तिने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्याने अभ्यास सुरू ठेवला.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

या अधिकाऱ्यांकडून घेतली प्रेरणा

IPS अधिकारी भरत आंधळे आणि विश्वास नांगरे-पाटील यांच्या कामगिरीने ती प्रेरित झाली. त्यांची पुस्तके आणि व्हिडिओ पाहून तिने प्रशासन सेवेत जाण्याचा निर्धार केला.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

गावाची पहिली IPS

धनश्रीचे वडील जिभाऊ अहिरे हे शेतकरी असून कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. पाटणे गावातील पहिली महिला IPS अधिकारी झाल्याने गावकऱ्यांनी तिचा सत्कार केला.

Dhanshri Ahire IPS | Sarkarnama

NEXT : बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन

UPSC Civil Services Result 2025 prajwal pol | Sarkarnama
येथे क्लिक करा