Mangesh Mahale
UPSCच्या नागरी सेवा परीक्षा-2025 च्या निकालात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रज्वल राजेंद्र पोळ यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
प्रज्वल पोळ यांनी वयाच्या 25 व्या वर्षी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले असून ऑल इंडिया रँक 434 आली आहे.
प्रज्वल यांची भारतीय महसूल सेवा (आयकर अधिकारी) पदावर निवड झाली आहे.
शेतकरी कुटुंबातील प्रज्वल यांनी कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता हे यश मिळविले.
कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी असतानाही प्रज्वल यांची नागरी सेवेत काम करण्याची जिद्द होती. त्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.
सर्वप्रथम यूपीएससीचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) समजून घेतले आणि त्यानुसार तयारी सुरू केली.
आठवड्याला आणि महिन्याला टार्गेट ठरवून अभ्यास केला. स्वअभ्यास, पुस्तके आणि PYQs यांवर अधिक भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाखतीसाठी प्रामुख्याने मॉक इंटरव्ह्यू दिले. चालू घडामोडींचा अभ्यास केला आणि स्वतःची मते संतुलित व तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्याचा सराव केला.
NEXT: जिथं भांडी घासली तिथंच खाकी वर्दीत सत्कार झाला! वेटर ते PSI: संग्राम मळकर यांची संघर्षगाथा तुम्हाला माहीत आहे का?