सरकारनामा ब्यूरो
तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्हातील रहिवासी असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील ईश्वर्या यांचे बालपण प्रचंड संघर्षात गेले. त्यांनी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी UPSC दोनदा पास केली.
ईश्वर्या रामनाथन या तमिळनाडू केडरच्या IAS अधिकारी असून त्यांची सक्सेस स्टोरी एकदा वाचाच.
ईश्वर्या यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले खरे पण त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली.
त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा पास करत 630 वा रँक मिळवला. त्यानंतर ईश्वर्या यांची भारतीय रेल्वे खातेसाठी निवड झाली.
मात्र त्यांना आयएएस अधिकारीचं व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
2019 मध्ये UPSC परीक्षा दिली आणि त्या 47 वा क्रमांक मिळवत परीक्षा पास झाल्या.