Roshan More
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ते विजयी झाले तर दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष होतील.
कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पार्टीकडून राष्ट्रध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.
डेमोक्रेटिक पार्टीकडून विद्यमान राष्ट्रध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार होते. मात्र प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी माघार घेत कमला हॅरिस यांना पाठींबा दिला.
कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी लढत अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी होणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी अमेरिकेच्या राष्ट्रध्यपदासाठी मतदान होते.
अमेरिकेत निवडणुकीचे दिवस राज्यानुसार बदलत होते. परंतु 1845 मध्ये संपूर्ण देशासाठी एकच निवडणुकीचा दिवस ठरवण्यासाठी कायदा करण्यात आला.
अमेरिकेच्या कायद्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील पहिला मंगळवार हा मतदानासाठी ठरवण्यात आला. कारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतीचे जास्त काम नसते त्यामुळे मंगळवार हा दिवस निश्चित करण्यात आला.