Vijaykumar Dudhale
शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी ही जोडी शेतकरी संघटनेच्या छत्राखाली काम करत होती.
शरद जोशी यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींसोबत राहणे पसंत केले होते.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीला पाठिंबा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोत यांना 10 जून 2016 रोजी विधान परिषदेवर संधी दिली.
विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली. त्यांच्याकडे कृषी, फलोत्पादन आणि पणन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर खोत आणि शेट्टी यांच्यात दरी पडत गेली आणि खोत यांनी शेट्टींची साथ सोडली.
तत्पूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी माढा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
सदाभाऊ खोत यांनी इचलकरंजीतून लोकसभा निवडणूक पुन्हा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ती जागा शिवसेनेकडे असल्याने त्या जागेवर धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
भाजपने विधान परिषदेच्या पाच जागांपैकी एक जागा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्यासाठी सोडली असून त्यांची उमेदवारी आज जाहीर केली आहे.