Rashmi Mane
पुन्हा एकदा देशातील शेतकरी एकत्र आले असून त्यांनी आपल्या मागण्या सरकारकडे पूर्ण व्हाव्यात यासाठी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे.
राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने कूच केले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एमएसपी कायदा, वीज कायदा 2020 रद्द करणे, लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई आणि शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्यांवरील खटले मागे घेणे यांचा समावेश आहे.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी एमएसपी, कर्जमाफी आणि कायदेशीर हमी यावर विचार करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की समिती स्थापन करणे आणि तिच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे ही दीर्घ प्रक्रिया आहे. त्यामुळे निर्णय तात्काळ घेण्यात यावा.
भूसंपादन कायदा 2013 पुनर्स्थापित करणे याचाही समावेश शेतकऱ्यांच्या इतर प्रमुख मागण्यांमध्ये आहे.
जागतिक व्यापार संघटनेतून माघार, गेल्या आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई अशा अनेक मुद्द्यांमध्ये शेतकरी नेते गुंतलेले आहेत.