Rashmi Mane
खूप कमी लोक आहेत जे पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'चे तीनही टप्पे यशस्वीपणे पार करतात.
सिंह यांचाही या लोकांच्या श्रेणीत समावेश आहे.
2017 मध्ये सिंह यांनी पहिल्याच प्रयत्नात 154वा रँक मिळवत, 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्या 'आयपीएस' अधिकारी बनल्या.
प्राची सिंह यांनी महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या मुद्द्यांवर लखनऊमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
2022 मध्ये सिंह यांनी 'पिंक बूथ'ची स्थापना केली. महिलांवर घरगुती अत्याचार होत असेल किंवा सुरक्षेची काळजी वाटत असेल तर, महिला पिंक बुथवर जाऊन पोलिसांची मदत घेऊ शकतात.
प्राची सिंह यांच्यामुळे यूपीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात मदत झाली आहे.
प्राची सिंह श्रावस्तीच्या पहिल्या महिला 'एसपी' बनल्या आहेत.