सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी (ता. 25) ऑनलाइन वितरित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींनी PM किसान योजना सुरु केली त्यावेळी विरोधकांनी सरकारवर टीका केली. पण या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. असे फडणवीस कार्यक्रमात म्हणाले.
PM किसान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने राज्य सरकारने योजनेच्या निधीत वाढ करुन वर्षाला 15 हजार रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा यावेळी केली.
शेतकऱ्यांच्या उत्पादनावरील खर्च कमी करुन त्यांना जास्तीत जास्त बाजारपेठांशी जोडणे हाच मुख्य हेतू असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाव डिजिटल बनवण्याचे काम सुरु आहे. यामुळे गावाला आणखी सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले असून पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही, असेही ते म्हणाले.
सरकारने कृषी सोलर पंप योजना सुरू केल्यापासून 2 लाख कनेक्शन, तर गेल्या 1 वर्षात दोन लाख कनेक्शन दिलेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 ला करण्यात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा निधी तीन हप्त्यांत प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे दिले जातो