Ganesh Sonawane
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतीच शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्दी योजना जाहीर केली आहे.
कृषी समृद्दी योजनेचा मुख्य हेतु शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व शेतीला अधिक शाश्वत बनवणे हा आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्रात दरवर्षी तब्बल 5 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. ज्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आहे.
योजनेत पाणी व्यवस्थापन, मृदा आरोग्य, हवामान अनुकूल शेती आणि मूल्य साखळी विकास यासारख्या घटकांवर भर दिला जाणार आहे.
यासोबतच नैसर्गिक शेतीसाठीही स्वतंत्र अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही योजनांमुळे शेती अधिक शाश्वत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी ठरणार आहे.
या योजनेमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेती अधिक पर्यावरण पूरक होईल.
शेतकऱ्यांचा खर्च कमी करुन त्यांचा नफा वाढवणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
याशिवाय शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादकता वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी मूल्य साखळी बळकट करणं, श्वाश्वत शेती पद्दतीला प्रोत्साहन देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.