Jagdish Patil
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
एका लग्न समारंभात अब्दुल्ला यांच्यावर हल्लेखोराने गोळी झाडली पण यातून ते सुदैवाने बचावले.
या हल्लेखोराचं नाव कमल सिंग जामवाल (63) असं असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
20 वर्षापासून मी अब्दुल्लांची हत्या करण्याचा प्रयत्न करत असून तो माझा अजेंडा असल्याचा दावा आरापीने केला.
आरोपीचा जन्म 1963 साली झाला असून त्याची जम्मूच्या ओल्ड सिटी भागात त्याच्या काही दुकाने आहेत.
या दुकानांमधून येणाऱ्या भाड्यावर कमल सिंग आपला उदरनिर्वाह करतो
दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागे दहशतवादी कट असल्याचा संशय फेटाळून लावला.
फारूख यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर हल्ला केला त्यावेळी आरोपी कमल सिंग मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं.
शिवाय गोळीबारासाठी वापरण्यात आलेली रिव्हॉल्व्हर आरोपीचीच असल्याचंही तपासात समोर आलं आहे.