Vijaykumar Dudhale
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमन अर्थात एमआयएम पक्षाकडून फारुक शाब्दी यांना विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
एमआयएमकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झालेले फारुक शाब्दी यांचे शिक्षण बी. कॉम पर्यंत झाले आहे.
फारुक शाब्दी हे 2016 पासून एमआयएममध्ये सक्रीयपणे काम करीत आहेत.
फारूक शाब्दी हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी 2019मध्ये एमआयएमकडूनच निवडणूक लढवली होती.
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत फारूक शाब्दी यांनी प्रणिती शिंदे यांना टक्कर दिली होती. मातब्बर नेते असतानाही शाब्दी यांनी दोन नंबरची मते त्या निवडणुकीत घेतली होती.
विधानसभेच्या उमेदवारीनंतर एमआयएमने फारूक शाब्दी यांच्यावर 2020 मध्ये सोलापूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तौफिक शेख आणि सर्व नगरसेवक सोडून गेल्यानंतरही शाब्दी यांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे काम केले
गेल्या पाच वर्षांपासून फारुक शाब्दी यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.
फारुक शाब्दी यांच्याकडे सध्या सोलापूर शहराबरोबरच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.