FASTag Annual Pass : महाराष्ट्रातील 'या' मार्गावर 3000 रुपयांचा FasTag पास लागू होणार नाही!

Rashmi Mane

महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास (FASTag Annual Pass) सुरु करण्याची घोषणा केली आहे.

FASTag Pass | Sarkarnama

वर्षभर मोफत प्रवास

या पासच्या माध्यमातून वाहनधारकांना वर्षभर मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळणार असून, त्याचा लाभ 200 ट्रीपपर्यंत घेता येणार आहे.

FasTag Pass Nitin gadkari | Sarkarnama

राष्ट्रीय महामार्ग लागू

परंतु हा दिलासा सर्व महामार्गांवर लागू होणार नाही. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येणाऱ्या महामार्ग आणि एक्सप्रेस वे वरच लागू असेल.

FASTag Pass | Sarkarnama

पास लागू होणार

जे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत अशा राज्य महामार्गवर हा पास लागू होणार नाही.

FASTag Pass | Sarkarnama

मोठा फटका

त्यामुळे राज्य महामार्गवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना टोलमध्ये दिलासा मिळणार नाही. त्यामुळे रोज अप-डाउन करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

FASTag Pass | Sarkarnama

मोठा अपवाद

यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या राज्य मार्गाचा समावेश आहे.

पास घेण्याची प्रक्रिया

हा पास घेण्याची प्रक्रिया मात्र सोपी ठेवण्यात आली आहे. "राजमार्ग यात्रा दूत" (Highway Saathi / Rajmarg Yatra Doot) या अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येईल.

फायदेशीर ठरणार

अर्ज करताना पेमेंट पूर्ण केल्यानंतर त्या दिवसापासून पुढील 1 वर्षापर्यंत हा पास वैध असेल. त्यामुळे NHAI अंतर्गत येणाऱ्या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी हा पास फायदेशीर ठरणार आहे

Next : तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे राज्यपाल अन् आता विराजमान होणार देशाच्या सर्वोच्च स्थानी?; कोण आहेत राधाकृष्णन?

येथे क्लिक करा