Aslam Shanedivan
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक राजीनामा दिला होता. तो राजीनामा त्यांनी कार्यकाळ शिल्लक असतानाही दिला होता.
त्यानंतर आज सायंकाळपर्यंत एनडीएने उपराष्ट्रपती पदाचा चेहरा दिला नव्हता. यामुळे विरोधकांकडून सतत टीका होत होती.
पण आज सायंकाळी भाजप संसदीय बोर्डाने एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव निश्चित केले.
ही घोषणा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली असून नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पुढील महिन्यात 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.
राधाकृष्णन तामिळनाडूचे रहिवासी असून त्यांचा जन्म तिरुप्पूर येथे 20 ऑक्टोबर 1957 रोजी झाला. तर वयाच्या 16 व्या वर्षी ते RSS आणि जनसंघात सामील झाले
तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपला बळकटी देणारे राधाकृष्णन दोनदा लोकसभेवर निवडून गेले असून तमिळनाडू भाजपचे ते अध्यक्ष राहिले आहेत.
31 जुलै 2024 पासून त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुत्रे हाती घेतली असून याआधी झारखंडचे राज्यपाल होते. त्यावेळी तेलंगणा आणि पुदुच्चेरीचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता.
तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी नद्या जोड, दहशतवादाविरोधात भूमिका, अस्पृश्यता निर्मूलन या मुद्यांवर 93 दिवसांची रथयात्रा काढली होती.