Mangesh Mahale
1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू होणार असून लाखो वाहनचालकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.
वार्षिक टोल पाससाठी नवीन दर 2026-27 आर्थिक वर्षासाठी लागू करण्यात येणार आहे.
हा पास फक्त खाजगी (गैर-व्यावसायिक) वाहनांसाठी आहे आणि त्यासाठी सक्रिय FASTag आवश्यक आहे.
वार्षिक टोल पासची किंमत वाढवली असून 1 एप्रिल पासून वाहनचालकांना वार्षिक पाससाठी 3000 रुपयाऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार आहे
ही सुविधा NHAI द्वारे प्रदान केली जाते आणि त्यांच्या वाहनात सक्रिय FASTag आवश्यक आहे.
वाहन मालक NHAI पोर्टलवर किंवा त्यांचा FASTag जारी करणाऱ्या बँके/अॅपवर लॉग इन करून वार्षिक पाससाठी अर्ज करू शकतात.
वार्षिक पाससाठी निर्धारित शुल्क (1 एप्रिल 2026 पासून 3075) ऑनलाइन भरावे लागेल.
पेमेंट केल्यानंतर, वार्षिक पास तुमच्या FASTag शी लिंक केला जातो आणि तुम्ही तो अतिरिक्त पैसे न देता टोल प्लाझावर वापरू शकता.