Rashmi Mane
वाहनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी! कालपासून फास्टॅग पास सुरू झाला आहे. वर्षभर मोफत प्रवासाची संधी.
फक्त 3000 रुपयांत वार्षिक फास्टॅग पास मिळणार आहे. या पासमुळे वर्षभर टोलमुक्त प्रवास करता येणार.
हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू होणार आहे. सर्वसाधारण टोल प्लाझावर मात्र लागू होणार नाही.
हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर वापरता येणार आहे. दरम्यान, या निर्णयाचा फायदा कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील लोकांना होणार आहे.
या पासमुळे टोल प्लाझावर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. वेळेची मोठी बचत होणार आहे.
पर्यटनासाठी वारंवार प्रवास करणाऱ्यांना तसेच नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्यांना विशेष फायदा होणार आहे.
पास खरेदी केलेल्या तारखेपासून तो एक वर्ष वैध असणार आहे. किंवा जास्तीत जास्त 200 ट्रिपसाठी वापरता येणार आहे.
हा पास कार, जीप, व्हॅन या वाहनांसाठी लागू होणार आहे.