Rashmi Mane
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशासाठी "मिशन सुदर्शन चक्र" सुरू करण्याची महत्त्वाची घोषणा केली.
मिशनचा उद्देश आधुनिक युद्धपद्धती लक्षात घेऊन अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि सुरक्षा कवच विकसित करणे आहे. यामुळे पुढील 10 वर्षांत देशाला प्रगत संरक्षण यंत्रणा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत 2035 पर्यंत देशातील सर्व महत्त्वाचे स्थळे – सामरिक तसेच नागरी क्षेत्रे जसे की रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि आस्था केंद्रे – तंत्रज्ञानाधारित सुरक्षा कवचाखाली आणली जातील.
मिशन सुदर्शन चक्रमध्ये संरक्षण (Defence) आणि आक्रमण (Attack) दोन्ही क्षमता असतील. म्हणजेच, केवळ बचाव नव्हे तर शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारी प्रणालीही यामध्ये असेल.
महाभारतातील जयद्रथ वध प्रसंगाचा उल्लेख करत पीएम मोदींनी सांगितले की भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने सूर्यप्रकाश रोखून युद्धात निर्णायक विजय मिळवून दिला होता. हाच प्रेरणास्त्रोत या मिशनसाठी आहे.
सुदर्शन चक्राची खासियत म्हणजे अचूक लक्ष्यभेदन आणि स्वयंचलित असणे. मिशनमध्येही हीच तत्त्वे – अचूकता, वेग आणि विश्वासार्हता – लागू केली जातील.
देशातील चार महानगरांसह इतर शहरांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षणासाठी अत्याधुनिक डिफेन्स सिस्टीम स्थापित केली जाईल.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान एस-400 संरक्षण कवचामुळे पाकिस्तानी क्षेपणास्त्र निष्प्रभ ठरली. अशाच यशस्वी तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल.