Aslam Shanedivan
FASTag वापरणाऱ्या वाहनमालकांसाठी केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत.
या बदलानुसार आता वाहनधारकाला FASTag जारी करणारी बँक जरी बदलली तरी नवीन FASTag घेण्याची गरज लागणार नाही.
ज्या पद्धतीने मोबाइल नंबर एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करता येतो, त्याच धर्तीवर FASTag देखील पोर्ट करता येणार आहे.
या सुविधेमुळे वाहनधारकांना नवीन FASTag घेण्याचा त्रास आणि त्यासाठी लागणारा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ‘One Tag’ फ्रेमवर्क मधून पोर्ट पर्याय उपलब्ध होणार आहे.
सध्या या फ्रेमवर्कमध्ये डझनभर प्रमुख बँकांचा समावेश करण्यात आला बँक निवडण्याचे स्वातंत्र्यही वाढणार आहे.
FASTag एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पोर्ट करण्याची प्रक्रिया ‘राजमार्ग यात्रा’ या Appच्या माध्यमातून करता येणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
स्थानिकांना वार्षिक पास
दरम्यान टोल प्लाझाच्या 20 किलोमीटरच्या परिसरातील स्थानिकांसाठी वार्षिक लोकल पास सुरू करण्याची तयारीही सरकारकडून केली जात आहे.