Ganesh Sonawane
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर ४ महिन्यांनी २,००० रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.
आता शेतकऱ्यांचे लक्ष २४ व्या हप्त्याकडे लागले आहे, मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जाहीर झाल्यानंतरही पैसे जमा झाले नाही, त्यांनी कुठे तक्रार करायची ते जाणून घेऊ....
शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत Grievance पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.
तक्रार नोंदवताना Registration Number किंवा Temporary ID वापरता येतो. त्यानंतर समस्येचे सविस्तर वर्णन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात.
तक्रार दाखल केल्यानंतर तिची स्थिती ऑनलाइन तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
हप्त्याची अडचण जर राज्यस्तरीय पडताळणी, पात्रता किंवा शेतकऱ्यांच्या रेकॉर्डशी संबंधित असेल, तर संबंधित राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करता येतो.
PM-KISANच्या अधिकृत पोर्टलवर राज्यनिहाय नोडल अधिकाऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे २४ वा हप्ता खात्यात जमा न झाल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.
सर्वप्रथम ऑनलाइन स्टेटस तपासा आणि समस्या कायम असेल तर अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.