FASTag Pass : 'या' अ‍ॅपवर अर्ज करा, मिळवा संपूर्ण वर्षाचा FASTag पास

Rashmi Mane

टोल फ्री प्रवासाची संधी

केंद्र सरकारने महामार्गावरील वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून FASTag वार्षिक पास सुविधा सुरू होणार आहे.

FASTag Pass | Sarkarnama

या वाहनांसाठी ही सुविधा

फक्त 3000 रुपयांमध्ये एक वर्ष किंवा 200 फेऱ्यांसाठी टोल फ्री प्रवास करता येणार आहे. हा पास खासगी कार, जीप किंवा व्हॅन मालकांसाठीच लागू असून, व्यावसायिक वाहनांना ही सुविधा मिळणार नाही.

FASTag Pass | Sarkarnama

कुठे लागू होणार?

हा पास संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (NE) नेटवर्कवर लागू असेल.

FASTag Pass | Sarkarnama

फायदे काय?

  • रोजच्या प्रवाशांचा वेळ वाचेल.

  • वारंवार टोल भरायची गरज नाही.

  • वार्षिक खर्चात मोठी बचत.

  • सलग टोल प्लाझामुळे होणारा त्रास कमी.

FasTag Pass

कुठे मिळवायचा पास?

वार्षिक पास मिळवण्यासाठी हायवे यात्रा मोबाईल अॅप किंवा एनएचएआयच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येईल. ऑनलाइन 3000 रुपये शुल्क भरल्यानंतर पडताळणी होऊन केवळ 2 तासांत पास अ‍ॅक्टिव्ह होईल.

FASTag Pass

अॅपवरून पास कसा काढायचा?

Rajmarg Yatra – NHAI अॅप डाउनलोड करा लॉगिन केल्यानंतर 3000 रुपये भरा. पास सक्रिय झाल्यावर टोल फ्री प्रवास होईल सुरू!

FASTag | sarkarnama

सर्वोत्तम पर्याय!

जर तुम्ही दररोज महामार्गावरून प्रवास करत असाल, तर FASTag वार्षिक पास तुमच्यासाठी वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचवणारा सर्वोत्तम पर्याय!

FASTag Pass | Sarkarnama

Next : कबूतरखान्यांची मुळे प्राचीन इतिहासात... मुघल दरबारात होती 20 हजारांची फौज 

येथे क्लिक करा