Rashmi Mane
सध्या सोशल मीडियावर FASTag संदर्भातील एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात येतोय की...
1 जानेवारी 2026 पासून 7-सीटर खासगी वाहनांवर अॅन्युअल FASTag पास चालणार नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हायरल पोस्टनुसार, केवळ 5-सीटर कारसाठीच FASTag वैध राहील, तर 7-सीटर गाड्यांसाठी तो बंद केला जाणार आहे. हा निर्णय NHAI ने घेतल्याचे सांगितले जात आहे.
या इमेजमध्ये “Important Notice” असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. 7-सीटर कारवर क्रॉस, तर 5-सीटर कारवर टिकमार्क दाखवण्यात आला आहे. विश्वास बसावा म्हणून NHAI चा लोगोही वापरण्यात आला आहे.
या दाव्याला कोणताही अधिकृत आधार नाही. NHAI किंवा केंद्र सरकारने असा कोणताही नियम जाहीर केलेला नाही. ही माहिती पूर्णपणे खोटी आहे.
NHAI कडून स्पष्ट करण्यात आले आहे की FASTag संदर्भात 5-सीटर किंवा 7-सीटर वाहनांसाठी कोणताही नवीन नियम लागू करण्यात आलेला नाही.
अशा खोट्या पोस्ट्स केवळ गोंधळच नाही तर फसवणुकीचे साधन ठरू शकतात. काही वेळा यामधून बनावट लिंक पाठवून आर्थिक फसवणूकही केली जाते.
FASTag संदर्भातील कोणताही बदल नेहमी NHAI किंवा सरकारकडून अधिकृत नोटिफिकेशनद्वारेच जाहीर केला जातो.