Rashmi Mane
प्रजासत्ताक दिवस हा केवळ राष्ट्रीय उत्सव नाही, तर भारताची ओळख जगासमोर मांडणारा दिवस आहे.
दरवर्षी पंतप्रधान मोदींचा पोशाख वेगळा असतो, पण संदेश एकच असतो—भारत विविधतेतून नटलेला एकतेचा आदर्श देश आहे.
प्रजासत्ताक दिवस 2026 रोजी पंतप्रधान मोदी साधेपणाचा सुंदर संगम या पोशाखात दिसले.
त्यांनी हलक्या स्काय ब्लू रंगाची स्लीव्हलेस नेहरू जॅकेट आणि गडद नेव्ही ब्लू रंगाचा कुर्ता घातला होता.
पंतप्रधानांनी घातलेला बांधणी शैलीतील साफा म्हणजेच फेटा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
साफ्याच्या मागील बाजूस हिरवे, पिवळे आणि लाल रंग दिसत होते, जे राजस्थानी-गुजराती संस्कृतीचे प्रतिक आहेत.
पंतप्रधान मोदींच्या या वेषभूषेतून भारताची सांस्कृतिक समृद्धी, एकता नेहमीच दर्शवत असतात.