IPS Aishwarya Dongre: धडधडणाऱ्या हृदयाचं 35 मिनिटांचं 'एअरलिफ्ट' मिशन; मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याची जबरदस्त स्टोरी

Deepak Kulkarni

महाराष्ट्रातील अनेकजण प्रशासकीय सेवेत...

महाराष्ट्रातील अनेकजण प्रशासकीय सेवेत देशभरातील विविध राज्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऐश्वर्या डोंगरे याही एक आहेत.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

मुंबईत जन्म

ऐश्वर्या या मराठमोळ्या आयपीएस अधिकारी आहेत.ज्यांचा जन्म मुंबईत झाला त्यांचं शिक्षणही येथेच झालं आहे.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्नं

ऐश्वर्या यांचं पहिल्यापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्नं होतं. त्यानुसारच त्यांनी पावलं टाकताना सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात दुहेरी पदवी घेतली आहे.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

देशात 196 रँक

ऐश्वर्या यांनी 22 व्या वर्षी आपले कर्तृत्व सिद्ध केले. पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं पण त्याचसोबत त्यांनी संपूर्ण देशात 196 रँक मिळवली आहे.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत

भारतीय पोलीस सेवेत केरळ केडरमध्ये पाच वर्षांहून अधिककाळ सेवेते राहिल्या आहेत.तसेच त्या धडाकेबाज कारवाईमुळे त्या कायम चर्चेत असतात.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

अंगावर शहारे आणणारी घटना

ऐश्वर्या यांच्या जीवनातील एक अंगावर शहारे आणणारी घटना कायमच लक्षातच राहणारी आहे.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

तिरुवनंतपुरम ते कोचीपर्यंतच्या एअरलिफ्ट

ज्यावेळी ऐश्वर्या यांची शांघुमुघममध्ये पोस्टिंग होती.तिथे अखेरच्या टप्प्यांत त्या जिवंत हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी तिरुवनंतपुरम ते कोचीपर्यंतच्या एअरलिफ्ट त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

लाईफटाईम लक्षात राहणारी घटना...

त्या परीक्षा पाहणारी घटना त्यांच्या लाईफटाईम लक्षात राहणारी अशीच आहे. त्या त्यांच्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख करत असतात. त्यावेळी ऐश्वर्या या विमानतळाच्या प्रभारी एसीपी पदावर कार्यरत होत्या.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

फक्त 35 मिनिटांत हृदय पोहोचवण्याची किमया

त्यावेळी ऐश्वर्या यांनी रूग्णालयापासून विमानतळापर्यंतच्या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर, केरळ पोलिसांचे हेलिकॉप्टर,वैद्यकीय पथकाशी समन्वय अशी परिस्थिती सक्षमपणे हाताळत फक्त 35 मिनिटांत हृदय पोहोचवण्याची किमया साधली होती. या घटनेची मोठी चर्चा झाली होती.

IPS Aishwarya Dongre | Sarkarnama

NEXT : 'धडाकेबाज' IAS अधिकारीही असुरक्षित..? चोरट्यांनी मारला डल्ला; कोण आहेत विजया जाधव?

Vijaya Jadhav | Sarkarnama
येथे क्लिक करा