Rashmi Mane
परिहार यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1992 रोजी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील एका छोटया गावात झाला.
तपस्याने त्यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुण्याच्या 'आईएलएस लॉ कॉलेज' पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तपस्याने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली. तपस्याला पहिल्याच प्रयत्नात अपयश आले.
तपस्या परिहार यांचे वडील शेतकरी आहेत.
परिहार यांनी कायद्याची पदवी मिळवल्यानंतर कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर, घाबरुन न जाता तपस्या यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला.
2017 मध्ये दुसऱ्यांदा यूपीएएसी परीक्षा देण्याचा निश्चय केला. प्रचंड मेहनतीच्या बळावर 23 वा क्रमांक मिळवत 'यूपीएएसी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या.