सरकारनामा ब्यूरो
अंजली ठाकूर या बिहार येथील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर UPSC सारखी कठीण परीक्षा केली. वाचा त्यांची सक्सेस स्टोरी...
अंजली यांचे कुटुंब गुजरात येथील सूरतमध्ये राहत असून त्यांचे वडील एलआईसी एजंट म्हणून काम करतात तर आई गृहणी आहेत.
लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या अंजली यांनी विज्ञान शाखेतून 12वीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी गणित विषयात पदवी प्राप्त केली.
शिक्षण घेत असतानाच त्यांना सिव्हील सर्विसमध्ये जाण्याची इच्छा होती. त्यामुळे पदवी प्राप्त केल्यानंतर अंजली ठाकूर यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
UPSC परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी कोंचिग क्लासेस लावायचे ठरवले, मात्र कोरोना काळात लाॅकडाउन लागल्याने त्यांना क्लास लावता आला नाही. त्यामुळे अंजली यांनी ऑनलाइन अभ्यास सुरु केला.
2022 ला त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली, मात्र त्यांना 952 गुण मिळूनही अंतिम लिस्टमध्ये नाव आले नाही. त्यांची यूपीएससीच्या राखीव यादीत निवड झाली आणि त्यांना भारतीय पोस्ट आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवा (आयपी अँड टीएएफएस) केडर मिळाले.
भारतीय पोस्ट आणि दूरसंचार लेखा आणि वित्त सेवा ट्रेंनिग घेत असताना त्यांनी 2023 ला दुसऱ्यांदा परीक्षा दिली.
UPSC परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी 43 वा रँक मिळवला. त्यांच्या रँकसह त्यांची नियुक्ती IAS साठी करण्यात आली असून त्यांना गुजरात केडर मिळाले.