Amol Sutar
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिलं आहे.
त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक मानले जाते. त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.
स्वामिनाथन हे आपल्या देशातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी प्रथम गव्हाचे अधिक उत्पन्न देणारे वाण शोधून काढले आणि त्या वाणांची शेतकर्यांना ओळख करून दिली.
त्यांना शेतकर्यांचा कैवारी देखील म्हटले जाते. बटाटा, तांदूळ, गहू, ताग इत्यादींवरील संशोधनाचे श्रेय त्यांना मिळाले आहे.
भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरुन त्यांनी हरितक्रांती घडवून आणली.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
1960 च्या दशकात भारत प्रचंड दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी त्यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने गव्हाचे HYV बियाणे विकसित केले.
त्यांचे पूर्ण नाव मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन असून यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे झाला.
UPSC परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेत IPS पदासाठी पात्र ठरले. मात्र त्यांनी ते सोडून कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.