Aslam Shanedivan
FCRA म्हणजे परदेशातून मिळणाऱ्या देणग्या किंवा अनुदानावर नियंत्रण ठेवणारा कायदा
FDI म्हणजे परदेशी कंपन्या किंवा गुंतवणूकदारांकडून भारतात केली जाणारी व्यावसायिक गुंतवणूक
FCRA मध्ये NGO, ट्रस्ट, सोसायटी, चॅरिटेबल संस्था आणि काही व्यक्तींना पैसा मिळतो. तर FDI मध्ये भारतीय कंपन्या, स्टार्टअप्स आणि व्यवसायांना
FCRA मध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक किंवा विकासाच्या कामांसाठी तर FDI मध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी, विस्तारासाठी, कारखाना उभारण्यासाठी, शेअर्स खरेदी करण्यासाठी किंवा नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी
FCRA हा देणगीचा पैसा असल्याने कोणतीही मालकी मिळत नाही. पण FDI मध्ये थेट गुंतवणूक होत असल्याने गुंतवणूकदाराला कंपनीमध्ये हिस्सा (Equity) किंवा मालकी मिळते
FCRA साठी गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs – MHA) आणि FDI मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT), RBI आणि संबंधित मंत्रालय
FCRA साठी FCRA, 2010 आणि FDI साठी FEMA, 1999 आणि FDI Policy असा कायदा आहे.