Ganesh Sonawane
FDA च्या तपासणीनंतर मंत्रालयाच्या उपाहारगृहात ( कँटिन) अनेक चांगल्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्यापूर्वी उपाहारगृहात अस्वच्छता होती. अस्वच्छ बेसीन, उघडे खाद्यपदार्थ, खरकटे या सर्वांमध्ये बदल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यातील सातत्यपूर्ण कारवायांनंतर मागील १५-२० दिवसांपासून मंत्रालयाच्या उपाहारगृहामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
1. मंत्रालयातील उपाहारगृहात पदार्थांवर जाळ्या ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
2. कचऱ्यासाठी ओले-सुके स्वतंत्र डबे ठेवण्यात आले आहे.
3. कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर आच्छादन, अॅप्रन आणि गणवेश असा पेहराव Mantralaya Canteen
4. चांगल्या दर्जाच्या भांड्यांची खरेदी करण्यात आली आहे. उपाहारगृहातील फरशा, पटल, भांडी एकदम स्वच्छ आणि चकचकीत करण्यात आली आहेत.
5. अनावश्यक साहित्य हटविण्यात आले आहे.