नाशिकमध्ये वारंवार भूकंप का? जमिनीखाली नेमकं काय घडतंय?

Ganesh Sonawane

वारंवार भूकंप का?

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कमी तीव्रतेचे असूनही हे धक्के नागरिकांना स्पष्टपणे का जाणवत आहेत? यामागे नेमकं काय कारण आहे?

Earthquake nashik | Sarkarnama

8 ऑगस्टचा धक्का

8 ऑगस्टच्या भूकंपाची खोली अवघी 5 किलोमीटर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या जितका जवळ असतो, तितके त्याचे हादरे पृष्ठभागावर अधिक जाणवू शकतात. त्यामुळे कमी तीव्रतेचा धक्काही नागरिकांना जोरदार वाटू शकतो.

Earthquake nashik | Sarkarnama

टेक्टॉनिक प्लेटचा ताण

भारतीय टेक्टॉनिक प्लेट उत्तरेकडे सरकत असून तिची युरेशियन प्लेटशी सतत टक्कर होत आहे. हिमालयात निर्माण होणारा हा भूगर्भीय ताण शेकडो किलोमीटर दूर दख्खनच्या पठारापर्यंत आणि नाशिकपर्यंत पोहोचू शकतो. याला Intraplate Stress म्हटलं जातं.

Earthquake nashik | Sarkarnama

जमिनीखाली जुन्या भेगा

नाशिकच्या पश्चिम भागात जमिनीखाली जुन्या भूगर्भीय भेगा म्हणजे Faults आहेत. प्लेटच्या हालचालींमुळे निर्माण होणारा ताण या भेगांवर परिणाम करत राहतो. त्यामुळे तिथे हालचाल होण्याची शक्यता निर्माण होते.

Earthquake nashik | Sarkarnama

पावसाचाही संबंध

सुरगाण्यासारख्या भागात मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत झिरपू शकतं. हे पाणी बेसॉल्ट खडकांमधील भेगांमधून खोलवर जाऊ शकतं. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा दाब म्हणजेच Fluid Pore Pressure वाढू शकतो.

Earthquake nashik | Sarkarnama

पाण्याचा दाब

भूगर्भातील पाण्याचा दाब वाढल्याने आधीच ताण असलेल्या भेगांमधील घर्षण कमी होऊ शकतं. परिणामी या भेगांमध्ये हालचाल होऊन भूकंपाचे छोटे धक्के निर्माण होण्याची शक्यता असते. सध्याच्या भूकंप मालिकेमागे ही संभाव्य भूमिका असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

Earthquake nashik | Sarkarnama

‘Earthquake Swarm’

कमी कालावधीत एका परिसरात कमी तीव्रतेचे अनेक भूकंप होणे याला Earthquake Swarm म्हणतात. यात एकच मोठा Main Shock असतोच असं नाही. भूगर्भातील ताण छोट्या-छोट्या धक्क्यांच्या मालिकेतून बाहेर पडू शकतो.

Earthquake nashik | Sarkarnama

कमी तीव्रता तरी हादरे जोरात का..

भूकंपाची खोली कमी असणे — 8 ऑगस्टचा धक्का 5 किमी खोलीवर झाला. जमिनीत वाढलेलं पाणी — मुसळधार पावसानंतर जमिनीतील पाण्याचा दाब आणि स्थानिक परिस्थितीमुळे भूकंपाच्या लाटांचा परिणाम काही ठिकाणी अधिक जाणवू शकतो.

Earthquake nashik | Sarkarnama

मोठा भूकंप येणार का?

Earthquake Swarm दिसत आहे म्हणजे मोठा विनाशकारी भूकंप येणारच, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. मात्र सुरगाणा, पेठ, दिंडोरी परिसरातील धक्क्यांवर प्रशासन आणि तज्ज्ञांचे लक्ष आहे. भूकंपाची अचूक वेळ किंवा तीव्रता आधीच सांगता येत नाही.

Earthquake | Sarkarnama

NEXT : UPI पेमेंट करणाऱ्यांनो लक्ष द्या! फ्रॉड रोखण्यासाठी येतेय महत्वाची अपडेट

येथे क्लिक करा