Jagdish Patil
भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या 3 युद्धनौकांचे राष्ट्रार्पण मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं.
PM मोदींनी या युद्धनौकांमुळे नौदलाचं सामर्थ्य वाढल्याचं सांगत त्या बनवणासाठी योगदान देणाऱ्यांचं अभिनंदन केलं. या 3 युद्धनोकांचं वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया.
INS सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B अंतर्गत तयार केलेले चौथे आणि शेवटचे स्टेल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र विनाशक आहे.
ते भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने डिझाइन केलं असून यामध्ये अत्यानुधिक रडार यंत्रणा बसवली आहे, ज्यामुळे शत्रूवर गुप्तपणे हल्ला करता येणार आहे.
INS सूरतचे वजन 7,400 टन असून ते 164 मीटर लांब आहे. ते 'कम्बाइंड गॅस अँड गॅस' प्रणालीसह 30 सागरी मैल वेगाने धावू शकते. यावरुन चेतक हेलिकॉप्टरही ऑपरेट होऊ शकते.
हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत पहिले स्टेल्थ फ्रिगेट असून त्याचे वजन 6,670 टन आहे तर ते 149 मीटर लांब आहे. रडार सिग्नेचर कमी करण्यासाठी त्याची खास रचना करण्यात आली आहे.
ते सुपरसॉनिक पृष्ठभाग-ते-पृष्ठभाग आणि मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.
INS वाघशीर ही भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन-श्रेणी प्रकल्प 75 अंतर्गत बांधलेली सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे.
ती 1,550 टन वजनाचे असून 67 मीटर लांब पाणबुडी असून वायर-गाइडेड टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि सोनार यंत्रणांनी सुसज्ज आहे.