Jagdish Patil
यंदाच्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देशासह परदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती, संत आणि अध्यात्मिक गुरू प्रयागराजमध्ये उपस्थित झाले आहेत.
तर सध्या या महाकुंभमेळ्यातील हर्षा रिचारिया नावाची एक साध्वी चांगलीच चर्चेत आहे.
सोशल मीडियावर महाकुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून हर्षा रिचारियाचं नाव आघाडीवर आहे.
तर आता साध्वी बनलेली हर्षा रिचारिया यापूर्वी नेमकं काय काम करायची ते जाणून घेऊया.
साध्वी होण्याचा पर्याय का निवडला? असा प्रश्न विचारलं असता ती म्हणाली, "मी उत्तराखंडची आहे आणि आचार्य महामंडलेश्वरांची शिष्या आहे."
"मला जे काही करायचे होते ते सर्व मागे टाकून आता मन:शांतीसाठी हा मार्ग निवडला."
हर्षा रिचरिया ही निरंजनी आखाड्याशी संबंधित आहे. ती स्वतःला साध्वी तसेच सामाजिक कार्यकर्त्या मानतात.
साध्वी बनण्याआधी ती परदेशात डेस्टिनेशन वेडिंगही होस्ट करायची. या कामामुळे ती चांगली प्रसिद्ध झाली होती.
हर्षा रिचरिया सध्या उत्तराखंडमध्ये राहत असून तिचे मूळ घर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आहे.