Modi Government Scheme: मोदी सरकारची नवी योजना; अपघातग्रस्तांचा जीव वाचवणाऱ्यांना मिळणार मोठं 'बक्षीस'

Deepak Kulkarni

धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात अनेक धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हे निर्णय घेताना त्यांनी कधीही मागचापुढचा विचार केलेला नाही.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

अपघातांच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ

देशात दिवसागणिक अपघातांच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसून येत आहे. याच धर्तीवर मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

अपघातग्रस्तांच्या जीवाला धोका

या अपघातांमध्ये मृत्यू किंवा जखमी होणाऱ्यांचं प्रमाणही मोठं आहे. त्यात उपचारांला विलंब, पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा, नको म्हणून मदत करण्यास टाळाटाळ, उपचारांसाठी पैशांची चणचण यामुळे अपघातग्रस्तांच्या जीवाला धोका असतो.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

कॅशलेस उपचार योजना

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार लवकरच रस्ते अपघात पीडितांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

मोफत उपचार

या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना कमीत कमी सात दिवसांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

25 हजार रुपयांचं बक्षीस

याचदरम्यान, सरकारनं ‘राहवीर’ योजनेंतंर्गत सन्मान कोणत्याही रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला सरकारकडून 25 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे,असंही गडकरी यांनी जाहीर केलं आहे.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

पायलट प्रकल्प

सध्या कॅशलेस उपचार योजना हरियाणा, पंजाब,उत्तर प्रदेश आणि चंदीगडसह काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून यशस्वीपणे राबवण्यात आला आहे.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

66 टक्के प्रमाण हे तरुणांचं

दरवर्षी भारतात जवळपास 5 लाखांवर रस्ते अपघात होत असतात. जवळपास त्यात 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. यात 66 टक्के प्रमाण हे तरुणांचं असल्याचं धक्कादायक निरीक्षणही समोर आलं आहे.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

25 हजार रुपयांचे बक्षीस

मोदी सरकारची कॅशलेस उपचार योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रचंड महत्त्वाची ठरण्याची शक्यता असून ‘राहवीर’ योजनाही कोणत्याही रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसांनाही सरकारकडून 25 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

Modi Government Cashless Treatment New Scheme | Sarkarnama

NEXT : मुंबई महानगरपालिकेच्या नगसेवकांना किती पगार मिळतो?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai corporator salary | Sarkarnama
येथे क्लिक करा...