Deepak Kulkarni
UPSC मध्ये ऑल इंडियामध्ये 13 वी रँक मिळवत सोनल गोयल या 2008 मध्ये आयएएस अधिकारी झाल्या होत्या.
गोयल यांनी एकीकडे 'सीएस'चा अभ्यास करतानाच दुसरीकडे यूपीएससीची तयारीही जोरात सुरू केली होती.
सोनल यांनी कॉमर्सची पदवी मिळवल्यानंतर एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून करिअरची सुरुवात केली होती.
सोनल या यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली होती.
IAS अधिकारी असलेल्या सोनल यांच्याकडे 'ब्युटी विथ ब्रेन'चे म्हणून पाहिलं जातं. त्यांना सोशल मीडियावर प्रचंड फोलोवर्स आहेत.
आयएएस महिला अधिकारी सोनल गोयल यांची मार्कशीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.
त्यांनी यूपीएससीची मार्कशीट 21 फेब्रुवारी 2024 ला सोशल मीडियावर शेअर केली होती.
ही मार्कशीट शेअर करतानाच त्यांनी त्यांच्या प्रेरणादायी नागरी सेवांमध्ये सामील होण्यापर्यंतचा प्रवास मांडला होता.
या पोस्टमध्ये त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेतील अपयश आणि यश याबद्दलचा अनुभव हा कथन केला होता.