Roshan More
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकताच मुंबईतील धारावीचा दौरा केला.
राहुल गांधी यांनी धारावीतील लघु उद्योग असलेल्या चमार स्टूडियोला भेट दिली.
राहुल गांधींनी पर्स, बॅग कशा बनवल्या जातात याची माहिती घेतली. आणि स्वतः लेदरपासून पर्स बनवली.
राहुल गांधींनी पर्स, बॅग बनवण्याचा अनुभव घेताना शिलाई मशिनद्वारे बॅग कशी शिवली जाते याचा देखील अनुभव घेतला.
राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितले होते की लघु उद्योगांना प्रोत्साहन दिले तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
राहुल गांधी यांनी पर्स, बॅग बनवणाऱ्या कारागिरीऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
राहुल गांधी यांनी चमार स्टुडिओचे संस्थापक सुधीर राजभर यांचे कौतुक करत त्यांचा उद्योगाला प्रोत्साहन दिले.