सरकारनामा ब्यूरो
अनेक वर्षांपासून देशाचे केंद्रीय अर्थमंत्री दरवर्षीचे अर्थसंकल्प मांडतात.
1 फेब्रुवारी 2024 ला आर्थिक वर्ष 2024-25 चा 'अंतरिम अर्थसंकल्प' सादर होणार आहे.
निर्मला सीतारामन आपला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
'बजेट डे'च्या दिवशी त्यांच्या आकर्षक आणि अनोख्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतात.
सीतारामन यांच्या या साड्या कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
आत्तापर्यंत पिवळी, गुलाबी, राखाडी, नारंगी आणि लाल अशा वैविध्यपूर्ण रंगांच्या सिल्क साड्या त्यांनी परिधान केल्या आहेत.
दरवर्षीच्या क्लासिक साड्यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे.
'बजेट डे'मधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे फोटो माध्यमांवर व्हायरल होत असतात.