Akshay Sabale
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी मुंबई लोकलनं प्रवास केला आहे.
निर्मला सीतारामण यांनी घाटकोपर ते कल्याण एसी लोकल ट्रेननं प्रवास केला.
त्यानंतर परतीचा प्रवास मुंबई उपनगरी लोकल ट्रेननं केला आहे.
अर्थमंत्री शनिवारी दुपारी 12.42 वाजता घाटकोपर ते कल्याण या प्रवासासाठी बदलापूर वातानुकूलित जलद लोकलमध्ये बसल्या.
नंतर परतीच्या प्रवासासाठी अर्थमंत्र्यांनी कल्याम येथून सायंकाळी 5.39 वाजता सुटणारी जलद नॉन-एसी ट्रेन निवडली.
प्रवासादरम्यान सीतारमण, विनम्रता आणि सुलभता दाखवली.
त्यावेळी सामान्य लोकांशी व सहप्रवाशांसोबत चर्चा केली.
अर्थमंत्र्यांनी स्टेशन कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.