Akshay Sabale
मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
"मला संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस करताय, मी मरावं अस देवेंद्र फडणवीसांना वाटतं," जरांगे-पाटलांनी फडणवीसांवर केला.
"हे सगळं देवेंद्र फडणवीस एकटे करत आहेत. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आहे.
"हा दरारा संपवण्याचं त्यांचं (फडणवीस) स्वप्न आहे."
"यात एकनाथ शिंदेंचेही एक-दोन लोक आहेत. अजित पवारांचेही दोन आमदार आहेत."
"सगेसोयऱ्यांचं होऊ द्यायचं नाही, काहीही करुन १० टक्के मराठ्यांवर लादायचं आणि हे पोरगं ऐकतच नाही, हे पोरगं इथंच संपलं पाहिजे, नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल."
"बदनाम तरी करावं लागेल, याला उपोषणात मरु द्यावं लागेल, म्हणून सोळावा दिवस उजाडला."
"सलाईनमधून विष देऊन तरी मारावं लागेल, असा यांचा विचार आहे. म्हणून मी सलाईन देखील बंद केली."
"नाहीतर याचं एन्काउंटर करावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे," असे गंभीर आरोपही जरांगेंनी केले.
"फडणवीसांना माझा बळी पाहिजे ना, मी येतो सागर बंगल्यावर.. समाजाशी असलेली इमानदारी मी नाही विकू शकत," असं म्हणत जरांगेंनी थेट आव्हान दिलं.