FIR, NC आणि तक्रार अर्ज, नेमका फरक काय? एका क्लिकवर समजून घ्या..

Ganesh Sonawane

तक्रार केली म्हणजे FIR होतेच असे नाही

पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याचे स्वरूप घटनेनुसार ठरते.
FIR, NC किंवा तक्रार अर्ज यांचे कायदेशीर परिणाम वेगवेगळे असतात.

Understand the difference between FIR, NC and a police complaint | Sarkarnama

FIR म्हणजे काय?

FIR म्हणजे First Information Report; दखलपात्र गुन्ह्यांमध्ये हा प्रथम अहवाल नोंदवला जातो. खून, दरोडा, बलात्कार, अपहरण, गंभीर मारहाण आणि मोठी फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांत FIR होते.

Understand the difference between FIR, NC and a police complaint, | Sarkarnama

FIR झाल्यानंतर पोलिसांना काय अधिकार?

दखलपात्र गुन्ह्यात पोलिस न्यायालयाच्या परवानगीशिवाय थेट तपास सुरू करू शकतात. आवश्यक असल्यास आरोपीला अटकही करता येते; त्यामुळे FIRला महत्त्वाचे कायदेशीर स्थान आहे.

Understand the difference between FIR, NC and a police complaint | Sarkarnama

NC म्हणजे काय?

NC म्हणजे Non-Cognizable Report; अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद म्हणजे NC.
किरकोळ मारामारी, शिवीगाळ, धमकी किंवा लहान स्वरूपाच्या वादांत NC दाखल केली जाते.

Understand the difference between FIR, NC and a police complaint | Sarkarnama

NC झाल्यानंतर पोलिस काय करू शकतात?

पोलिस NCची नोंद करून संबंधित व्यक्तींना समज देऊ शकतात.
मात्र न्यायालयाच्या आदेशाशिवाय अशा प्रकरणात सविस्तर तपास करता येत नाही.

Understand the difference between FIR, NC and a police complaint | Sarkarnama

तक्रार अर्जानंतर काय होते?

तक्रारीनंतर प्राथमिक चौकशी करून प्रकरणाचे स्वरूप पाहिले जाते.
त्यानुसार FIR नोंदवायची, NC करायची किंवा इतर कायदेशीर कारवाई करायची, याचा निर्णय घेतला जातो.

Understand the difference between FIR, NC and a police complaint, | Sarkarnama

तिन्हीमधील मुख्य फरक

FIR म्हणजे दखलपात्र गुन्ह्याची नोंद : NC म्हणजे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद तर तक्रार अर्ज म्हणजे घटनेची/समस्येची लेखी माहिती. म्हणून पोलिसांकडे तक्रार दिली म्हणजे लगेच FIR दाखल झाली, असा अर्थ होत नाही.

Understand the difference between FIR, NC and a police complaint | Sarkarnama

NEXT : मुलींच्या भविष्याची काळजी मिटली; जन्मापासून १८ वर्षांपर्यंत सरकार देणार 'इतकी' मदत, लगेच असा भरा फॉर्म!

Lek Ladki Yojana | Sarkarnama
येथे क्लिक कराल