फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास; तक्रारीसाठी हेल्पलाइन माहिती आहे का?

Pradeep Pendhare

सार्वजनिक ठिकाणी निर्बंध

रस्ते, मार्ग, गल्ल्या, पदपथ यांसह सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई असणार आहे.

MPCB helpline | Sarkarnama

हा नियम लक्षात ठेवा

रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय आणि न्यायालयांपासून 100 मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई असणार आहे.

MPCB helpline | Sarkarnama

रात्री दहानंतरचा नियम

ध्वनी प्रदूषण नियमानुसार आवाज करणारे फटाके रात्री दहा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत फटाके फोडण्यास मनाई आहे.

MPCB helpline | Sarkarnama

खासगी जागांबाबत निर्बंध

खासगी जागांमध्ये सोसायटींच्या आवारात मर्यादांचे पालन करून फटाके फोडता येणार आहे.

MPCB helpline | Sarkarnama

हरित फटाके

कमी आवाज, कमी प्रदूषण करणारे हरित फटाके वापरण्यावर भर द्यावा. फटाके विहित वेळेतच फोडावेत.

MPCB helpline | Sarkarnama

नियमानुसार कारवाई

फटाके फोडताना नियम भंग केल्यास उच्च न्यायालयानुसार, ध्वनी प्रदूषण नियम, पर्यावरण अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि स्फोटक पदार्थ अधिनियमानुसार कारवाई होईल.

MPCB helpline | Sarkarnama

प्रदूषण मंडळाचे आवाहन

फटाक्यांमुळे हवेत विषारी जड वायू आणि हानिकारक वायू मिसळतो. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी, फटाके फोडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCB helpline | Sarkarnama

संविधानानुसार कर्तव्य

भारतीय संविधानानुसार पर्यावरणाचे संरक्षण करणे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे शांततापूर्ण आणि स्वच्छ पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCB helpline | Sarkarnama

तक्रारीसाठी हेल्पलाइन

फटाक्यांमुळे ध्वनी अन् वायू प्रदूषणाचे उल्लंघन होत असल्यास MPCB हेल्पलाइनवर 7045113344 / 7045113322, मुख्य कार्यालय मुंबई- 022-67808888 किंवा 022-24020781 / 022-24014701 / 022-24010437 संपर्क साधावा.

MPCB helpline | Sarkarnama

NEXT : दुष्काळी शेतकऱ्यांना 5000 रुपयांची मदत

येथे क्लिक करा :