Pradeep Pendhare
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये आगाऊ मदत देण्याची घोषणा केली.
महाराष्ट्रातील 358 पैकी 305 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेत. तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होईल.
राज्यातील दुष्काळग्रस्त असलेल्या 1 ते 1.25 कोटी शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
सरकार पिक पंचनामे पूर्ण झालेले अन् पडताळणीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल. मात्र, तारीख अधिकृतरीत्या जाहीर नाही.
पीक नुकसानीचे पंचनामे, लाभार्थी यादी आणि तपशीलांची पडताळणी सुरू असून, अंतिम पात्रता सरकारच्या अंमलबजावणीच्या नियमांनुसारच होणार आहे.
शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा पंचनामा, स्थानिक प्रशासनाकडे लाभार्थी, बँक तपशील देणे, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा तहसील कार्यालयाच्या संपर्क ठेवावा.
महसूल किंवा कृषी विभागाकडे लाभार्थी यादीतील नाव आणि पडताळणी स्थिती महत्त्वाची आहे. परंतु, पैसे जमाची तारीख गृहीत धरता येणार नाही.
सरकारची ही 5000 रुपयांची मदतीसाठी सरकारच्या अधिकृत घोषणांवर आणि स्थानिक प्रशासनाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा.