Akshay Sabale
वंचित बहुजन आघाडीनं विधानसभेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोहा विधानसभा मतदारसंघातून शिवा नरंगले यांना उमेदवारी दिली आहे.
आटपाडी-खानापूर मतदारसंघातून संग्राम माने यांना वंचितनं संधी दिली आहे.
नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद यांना वंचितनं उमेदवारी दिली आहे.
विकास रावसाहेब दांडगे हे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अतुल सावे येथून आमदार आहेत.
साकोली विधानसभा मतदारसंघातून अविशान रघुनाथ नन्हे हे वंचितचे उमेदवार असणार आहेत.
नागपूर दक्षिण पश्चिम येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार आहेत. त्यांच्याविरोधात विनय भांगे यांना उमेदवारी दिली आहे.
निलेश विश्वकर्मा यांना धामणगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
मेघा किरण डोंगरे यांना वाशिममधून तिकीट देण्यात आलं आहे.
सविता मुंढे यांना सिंदखेडराजा मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे.
वंचितकडून प्रथमच तृतीयपंथी उमेदवार अर्थात शमिभा पाटील यांना रावेर मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे.
किसन चव्हाण यांना शेवगाव विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात आलेली आहे.